राजकारणातील सर्वात मोठी बातमी!! शरद पवारांचा अजित पवारांना फोन, नेमकी काय चर्चा झाली?

पुणे : अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलाच असल्याचे सांगत शरद पवारांपासून वेगळं होऊन महायुतीसोबत जाणे पसंत केले. महायुतीसोबत सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठं यश मिळालं.

तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा मोठा पराभव झाला. शरद पवारांचे केवळ १० आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली जात आहे.
मात्र, अजित पवारांनी या चर्चेला कुठलाही आधार नसल्याचे म्हटले. तर, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय सुप्रिया सुळे घेतील, असं शरद पवारांनी म्हटल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना रविवारी फोन केला होता. पुरंदरमधील शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शरद पवारांनी अजित पवार यांना फोन केल्याची माहिती मिळतेय. पुरंदरमधील शेतकरी शरद पवारांच्या भेटीला आले होते, त्यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांना फोन केला.

पुरंदर विमानतळासंदर्भात शेतकऱ्यांशी बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावा, यासह शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, त्यासंदर्भात बैठक घेऊन ते प्रश्न मार्गी लावा, असं शरद पवार यांनी अजित पवार यांना फोन करून सांगितल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, शरद पवार यांनी आधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता, मात्र ते एका महत्त्वाच्या बैठकीमध्ये असल्यानं शरद पवार यांचं त्यांच्याशी बोलणं झालं नाही, त्यानंतर शरद पवार यांनी लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन केला, अशी माहिती मिळतेय.