सर्वात मोठी बातमी! अखेर पूजा खेडकरला आयुष्याची अद्दल घडली, झाली मोठी कारवाई…


पुणे : गेल्या काही दिवसांपासून आयएएस पुजा खेडकर चर्चेत आहे. आता तिच्याबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता तिचे नॉन क्रिमीलेअर सर्टिफीकेट रद्द करण्याचा निर्णय नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिला आहे. यामुळे हा तिच्यासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे. गैर मार्गाने तिने परीक्षा दिल्याने तिची चौकशी सुरु आहे.

ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी नॉन क्रिमीलेअर सर्टिफीकेट आवश्यक असते. याबाबत पुजा खेडकरचे नॉन क्रिमीलेअर सर्टिफीकेट रद्द झाल्याने तिला ओबीसी आरक्षणाचा लाभ घेण्याचा अधिकार नव्हता हे स्पष्ट झालं आहे. केंद्र सरकारकडून नाशिकच्या विभागीय आयुक्तांना पुजा खेडकरच्या नॉन क्रिमीलेअर सर्टिफीकेटची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

याबाबत माहिती अशी की, पुजा खेडकरने ओबीसी असल्याचा दावा करत ओबीसी कोट्यातून आत्तार्यंत नऊ वेळा युपीएससीची परिक्षा दिली होती. त्यात अपयश आल्यानंतर पुजाने ओबीसी आणि दिव्यांग असल्याचा दावा करत नव्या नावाने परिक्षा देण्यास सुरुवात केली होती. मात्र तिच्या वागणुकीमुळे ती सापडली.

तिच्या दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत वाद निर्माण झाल्यानंतर तिला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर पुजा खेडकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. ट्रेनिंगमध्ये असताना तिची गाडी आणि इतर कारनामे पुढे आले होते. यामुळे तिची चौकशी सुरु आहे.

विभागीय आयुक्त नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी खेडकर यांचा ओबीसी प्रमाणपत्रासाठीचा अर्ज एक महिन्यापूर्वी फेटाळला होता. खेडकर यांनी आता राज्याच्या ओबीसी विभागाचे सचिव अप्पासाहेब धुळे यांच्याकडे आपला अर्ज दाखल केला आहे. त्यासाठी पूजा खेडकरने चार आठवड्यांची मुदतही मागितली आहे.

पूजा खेडकर 2023 च्या आयएएस बॅचमधील अधिकारी आहे. तिच्यावर ओबीसी नॉन-क्रीमी लेयर आणि दिव्यांग आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. पूजा खेडकरने खोटी जात आणि दिव्यांग प्रमाणपत्रे दिली असून मानसिक आजार, कमी दृष्टी व हालचालींची अडचण असे आजार असल्याचे दाखवून आरक्षण घेतले. यामुळे तपास सुरु आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!