लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! २१०० रुपयांच्या हप्त्याबाबत सर्वात मोठी माहिती आली समोर..


मुंबई : ज्या कुटुंबांचं आर्थिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील महिलांसाठी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गेल्या वर्षी जुलै महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली होती.

अशातच राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी महत्वाची बातमी दिली आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात २१०० रुपयांच्या हप्त्याची रक्कम नेमकी कधी पडणार याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

येत्या मार्च महिन्यातील अर्थसंकल्पानंतर हे पैसे महिलाच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. ही योजना बंद करण्याची कोणतीही योजना नसल्याचे देखील जलसंपदा मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लाडकी बहिण योजना सुरु केली होती. या योजनेत आता १५०० च्या ऐवजी २१०० रुपयांचा हप्ता देण्याचे आश्वासन राज्य सरकारने निवडणूकाच्या जाहीरनाम्यात दिले होते. त्याची पूर्णता अर्थसंकल्पाची मांडणी झाल्यानंतर होणार आहे.

आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते मिळालेले आहेत. आता डिसेंबर महिन्याचा लाडक्या बहिणीच्या खात्यावर पडण्यास सरुवात झाली आहे. आता २१०० रुपयाचा हप्ता थेट मार्च महिन्यातील अर्थ संकल्पानंतर मिळणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!