पुण्यात वातावरण तापलं! आरोपी येरवड्यातील तुरुंगात अन त्याच्या नावानं मतदान, आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह


पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांचे मतदान अंतिम टप्प्यात आले असताना पुणे महानगरपालिका निवडणुकीदरम्यान मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे गंभीर प्रकार समोर येत आहेत.येरवाड्यातील तुरुंगात असलेल्या आरोपीचेही मतदान झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आता आयोगाच्या कार्यपद्धतीवर आणि पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पुण्यातील प्रभाग 24 मध्ये तुरुंगातील व्यक्तीच्या नावावर बोगस मतदान झाल्याचं समोर आलं आहे. ज्या व्यक्तीच्या नावावर मतदान करण्यात आलं ती व्यक्ती येरवडा कारागृहात आरोपी आहे.याबाबत जे उमेदवार आहेत आणि कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून निवडणूक अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. मात्र, आयोगाकडून कुठलंही उत्तर मिळत नाही. त्यामुळे, कार्यकर्ते संताप व्यक्त करत आहेत.

दरम्यान, प्रभाग 24 ड मध्ये भाजपचे पुण्यातील निवडणूक प्रमुख गणेश बीडकर हे उमेदवार आहेत. त्यांना राष्ट्रवादीच्या गणेश नवघरे, शिवसेनेच्या प्रवीण धंगेकर यांचे आव्हान आहे. त्यामुळे, येथील लढतीकडे पुणेकरांचे विशेष लक्ष लागले असून आज मतदानाच्या दिवशी येथील प्रभाग 24 मध्ये बोगस मतदान झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे शहरात 41 प्रभागातून 165 नगरसेवक निवडून येणार आहेत. पुण्यात होणार चौरंगी लढत होत असून महायुतीमध्ये असणारे तिन्ही पक्ष स्वंतत्र लढत आहेत. भाजपला दोन्ही राष्ट्रवादीचे आव्हान तर शिवसेना आणि काँग्रेस, उबाठा, मनसे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे, मुंबईनंतर यंदा पुण्याच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!