पुणे महानगरपालिकेत गाजणार ‘ राम कृष्ण हरी’ चा गजर! निवडणुकीच्या तारखेपूर्वीच रामकृष्ण सातव यांच्या तयारीची धडकी…

वाघोली : पुणे महानगरपालिकेचे बिगुल वाजण्याची सुरुवात झाली असून आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी लवकरच प्रभाग रचना अंतिम टप्प्यात आली आहे. या प्रभागरचनेत आता अतिरिक्त २३ गावांचा सामावेश यंदाच्या निवडणूकीत झाला आहे. त्यामुळे वास्तविक पुणे महानगरपालिकेची सत्ता सूत्रे या नवीन गावांवर येऊन ठेपणार असून सत्तेची समिकरणे ही गावे बदलणार असल्याने मनपाच्या या घमासान निवडणुकीत वाघोलीचा सामावेश झाला असल्याने या गावातून पुणे बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांच्या तयारीचा सहभाग कोणत्या दिशेने आहे म्हणून चर्चेला उधान आले आहे.

वाघोली गाव पुणे महानगरपालिकेमध्ये समाविष्ठ झाल्याने प्रथमच वाघोलीतून नगरसेवक निवडून जाणार आहेत. प्रभाग रचना होताना वाघोलीचे दोन तुकडे होणार असून नगररोडचा अर्धा भाग लोहगाव, विमाननगर पर्यंत तर अर्धा भाग खराडी, चंदननगर पर्यंत जोडला जाण्याच्या चर्चांना उधाण आलेले आहे. अनेक इच्छुकांनी संपुर्ण वाघोलीचा एकत्रित प्रभाग होईल या दृष्टीने तयारी सुरू केली होती. परंतु वाघोलीचे दोन तुकडे झाल्यास अनेक इच्छुक उमेदवारांची निम्मी तयारी व ‘खर्च’ वाया गेल्याचे चित्र साध्या आहे. त्यातच माजी उपसरपंच तथा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामकृष्ण सातव पाटील यांनी निवडणुकीच्या मैदानात उडी घेतल्याने अनेकांना धडकी भरली आहे. वाघोली -खराडी असा प्रभाग झाल्यास या प्रभागातून रामकृष्ण सातव निवडणुक लढविण्याची शक्यता आहे.त्यामुळे त्यांच्या संभाव्य निवडणूकीत उतरण्याचा तयारीने चर्चांना उधान आले आहे.
पुणे बाजार समितीत रामकृष्ण सातव यांनी एकसंध राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली होती. त्यातून जास्त मते घेऊन विजय संपादीत केला होता. त्याच पद्धतीचा विजयाचा अंदाज राजकीय मान्यवर व्यक्त करु लागल्याने त्यांच्याकडे उमेदवारीची सर्वाधिक दावेदारी मानली जात आहे.

रामकृष्ण सातव यांच्या बाजार समितीच्या निवडणुकीत सुक्ष्म नियोजन, प्रचंड ताकद लावून तयारीनिशी ज्या पद्धतीने जिंकली त्याचीच मनपावर आहे. त्यांनी केलेल्या ‘लाभाची’ ख्याती तर थेट महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पर्यंत पोहोचलेली. अजितदादा तर जाहीर कार्यक्रम ‘आकडाच’ सांगितला होते. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांची सध्या तरी धाकधूक वाढली असल्याचे चित्र आहे. रामकृष्ण सातव हे निवडणुक जिंकण्यासाठी तगडी यंत्रणा उभी करू शकतात आणि त्यांच्या योग्य निवडणूक व्यवस्थापन या खासीयतीच्या बळावर ते कडवे आव्हान उभे करू शकतात.

एकंदरीत त्यांच्या एंट्रीने वाघोलीतील गणिते बदलली असून महानगरपालिका निवडणुक ही रंजक होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत वाघोली खराडी असा प्रभाग झाल्यास शांताराम कटके, रामकृष्ण सातव, संदीप सातव, समीर भाडळे, संतोष भरणे, सुरेंद्र पठारे, महेंद्र पठारे, सचिन सातपुते, शिवदास उबाळे इ. अनेक जण विविध पक्षांकडून इच्छुक दिसत आहेत. यातील अनेक जण स्वतः नाहीतर आपल्याच कुटुंबातील महिलेसाठी इच्छुक आहेत. लवकरच प्रभाग रचना व आरक्षण जाहीर झाल्यावर इच्छुकांची भाऊगर्दी अजून वाढू शकते. साध्या तरी अनेकांनी देव पाण्यात ठेवत आपआपल्या पद्धतीने निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे पहायला मिळत आहे.