आबासाहेब काळे युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार..


उरुळीकांचन : हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, अर्जुन पुरस्कार, छत्रपती पुरस्कार, कुमार महाराष्ट्र केसरी विजेत्या खेळाडूंच्या मानधनात ६ हजाराहून १५ हजार रुपयांची वाढ केल्याबद्दल मुंबई महापौर केसरी व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आबासाहेब काळे यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.

हिंद केसरी , महाराष्ट्र केसरी , अर्जून पुरस्कार प्राप्त खेळाडूंच्या मानधनात वाढ करावी म्हणून आबासाहेब काळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार अजित पवार यांनी या विजेत्या खेळाडूंना६ हजार रुपयांचे मानधन वाढून १५ हजार रुपये इतके केले आहे.

काल पुण्याच्या दौऱ्यावर अजित पवार हे असताना आबासाहेब काळे युवा क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र केसरी व हिंदकेसरी पुरस्कार्थींच्या वार्षिक मानधनात भरीव वाढ केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहे.

व्हिव्हिआयपी सर्किट हाऊस येथे आभाराचा कार्यक्रम करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, विविध पुरस्कारप्राप्त खेळाडू उपस्थित होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!