ठाकरेंना डिवचलं ‘ठाकरे ब्रॅण्ड कोमात,स्वदेशी देवाभाऊ जोमात’ ; शिवसेना भवनसमोर भाजपच्या पोस्टरनं खळबळ..


मुंबई : मुंबईतील बेस्ट कर्मचारी सहकारी पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाला.या पराभवामुळे पतपेढीवर ठाकरे गटाची गेली नऊ वर्षे असणारी सत्ता संपुष्टात आली. त्यानंतर भाजपने दादर येथील शिवसेना भवनासमोर पोस्टरबाजी करत उद्धव ठाकरेंना चांगलच डिवचलं आहे.’ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात’ असं लिहिलेले पोस्टर शिवसेना भवनासमोर लावण्यात आले आहे. या पोस्टरमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.

या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने 14, तर भाजपचे नेते आमदार प्रसाद लाडप्रणित श्रमिक उत्कर्ष सभेच्या सहकार समृद्धी पॅनेलने सात जागा जिंकल्या. या निवडणुकीत ठाकरे ब्रँडला एकही जागा मिळाली नाही. त्यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपच्या यशानंतर त्यांच्याकडून ‘ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात’ असं लिहिलेले पोस्टर शिवसेना भवनासमोर लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या पोस्टरवर केवळ उद्धव ठाकरे यांचे फोटो आहेत. राज ठाकरे यांचा फोटो लावणं भाजपने टाळल असल्याचं दिसून येत आहे.

ठाकरे गटाच्या पराभवानंतर त्यांनी असं म्हटलं आहे की, ‘ब्रँडचा बँड वाजविण्याचे काम जनता करीत असते. विधानसभा निवडणुकीत मतदारांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आम्ही 80 जागा लढवून 60 जागा जिंकलो. महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही महायुती प्रचंड बहुमताने जिंकेल,असा विश्वास भाजपने व्यक्त केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!