ठाकरे गटाचा मोठा निर्णय; विधानपरिषद उमेदवार जाहीर, कोणाला मिळाली संधी?


मुंबई : आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार पक्षाकडून अंबादास दानवे यांचे नाव निश्चित करण्यात आले असून ते उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतरही उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेले अंबादास दानवे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. २०१९ पासून ते विधान परिषदेत कार्यरत असून ऑगस्ट २०२२ पासून विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहत आहेत.

सुषमा अंधारे किंवा राजन विचारे यांच्या नावांची चर्चा असतानाही अखेर दानवे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत एका जागेसाठी २९ मतांचा कोटा आवश्यक आहे.

महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ आमदारांचे आहे, त्यामुळे एक उमेदवार सहज निवडून येऊ शकतो.दरम्यान, या निर्णयावर काँग्रेसची भूमिका काय असेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!