भयानक ! मुल होत नाही म्हणून विवाहीतेवर भोंदूबाबा, दिर यांच्याकडून सामूहिक बलात्कार ; जादूटोणा कायद्यांनुसार दोषींवर कारवाईची मागणी …


सांगली : सांगलीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंधश्रद्धेतून सासरच्या मंडळींनी विवाहितेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. मूल होत नव्हतं म्हणून पतीसह सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. त्यानंतर शुद्धीकरणाच्या नावाखाली पती, दीरासह एका भोंदूबाबाने सामूहित बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

याबाबत अधीक माहिती अशी की, पोलिसांनी काशीनाथ रामा उगारे या भोंदूबाबासह पीडितेचा पती आणि दिराला सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक केली आहे. तरुणीचा एका सुशिक्षीत कुटुंबातील तरुणासोबत विवाह झाला होता. पण मूल होत नसल्यानं सासरच्या मंडळींकडून तिचा छळ होऊ लागला. त्यानंतर अंधश्रद्धेतून घरात बुबा, बाबांकडून पूजा केली जाऊ लागली. बुवाचे पाय धुवून पाणीही प्यायला लावलं जात असे.

काही महिन्यापूर्वी गाडीने बाहेर जात असताना वाटेत गाडी बंद पडली. त्यावेळी सासरच्या लोकांनी भोंदूबाबा काशीनाथ उगारेला कॉल केला. त्याने पीडितेच्या कुटुंबियांना तुमची सून अपशकुनी असल्याचं सांगितलं आणि दुसऱ्याच दिवशी धार्मिक विधीसाठी कुटुंबियांना तयार केलं.

विश्रामबाग परिसरात भोंदूबुवा पीडितेच्या घरी आला. तिथं पूजेचे विधी केल्यानंतर पीडितेला अंघोळ करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर शुद्धीकरण करायचंय असं सांगून पती, दीर आणि भोंदूबाबाने पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. या प्रकारानंतर पीडितेला मोठा धक्काच बसला. माहेरी गेल्यानंतर ती नैराश्यात होती. कुटुंबियांनी विश्वासात घेऊन विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर पोलीस कारवाई करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!