‘माझ्या मुलाला अध्यक्ष करायच्या आधी माझा राजीनामा घ्या’!! केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मोठं वक्तव्य, नेमकं काय घडलं?

अमरावती : अमरावतीलमधील श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांनी मनोगत व्यक्त करताना राजकारणाबद्दल एक मोठं वक्तव्य केले. यामुळे याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
याबाबत ते म्हणाले, माझ्या मुलाला युवा मोर्चाचा अध्यक्ष करायचं आहे. असे एकदा मला प्रवीण दटके यांनी विचारलं होतं. त्यावर मी त्यांना म्हणालो की, त्याला अध्यक्ष करण्याच्या आधी माझा राजीनामा घेऊन टाका.’ असं मोठं वक्तव्य गडकरी यांनी केले आहे. तसेच ते म्हणाले, मी व्यावसायिक नाही. मला व्यवसायही करायचा नाही. मी जे काही केले, ती तोट्यातील कामे केली असतील, पण मुलांनी फायद्याची केली.
माझी मुलं राजकारणात नाहीत. मी एकदा घरात विषय आल्यावर त्यांनी मला विचारलं, प्रवीण दटके आता आमदार आहेत. त्यांनी मला एकदा विचारलं की, तुमच्या मुलाला आता युवा मोर्चाचा अध्यक्ष करायचं आहे. मी म्हणालो चांगली गोष्ट आहे. त्याला अध्यक्ष करण्याच्या आधी माझा राजीनामा घेऊन टाका आणि मग त्याला करा.
ते म्हणाले, तुम्ही असं कसं म्हणता. मी म्हणालो, मला मान्य नाही. आमदाराच्या पोटातून आमदार नाही झाला पाहिजे. खासदाराच्या पोटातून खासदार नाही झाला पाहिजे. माझा मुलगा म्हणून त्याला राजकारणात स्थान मिळेल, हे नाही, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.
तसेच नितीन गडकरी म्हणाले, मी सायकल रिक्षातून उद्घोषणा केल्या. पोस्टर चिकटवले. आणि शून्यातून काम केले. त्याने ते काम करावं. माझा मुलगा म्हणून नाही. यामुळे त्यांनी आपल्या मुलाला राजकारणात येण्यापासून विरोध केला आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.