बीडच्या कारागृहात संशयास्पद गोष्टी वाढल्या, वाल्मिक कराडला नाशिक कारागृहात हलवणार, नेमकं घडलं काय?


बीड : येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड सध्या परळी जेलमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत सुनावणी सुरु आहे. असे असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परळी कारागृहात त्याच्या हालचालींबाबत संशयास्पद बाबी आढळल्या. यामुळे पोलीस प्रशासन एक निर्णय घेण्यात आहे.

कराडला नाशिकच्या कारागृहात हलविण्याची तयारी सुरू आहे. बीडमध्ये कराड यांचे घनिष्ठ संबंध असलेल्या धनंजय मुंडे यांचा वरचष्मा आहे. या कारागृहात अनेक टोळीचे गुन्हेगार आहेत जे कराडला मारण्याची संधी शोधत आहेत. वाल्मीक कराड याच्यावर यापूर्वी प्रतिस्पर्धी टोळीकडून हल्ला झाला होता. तेव्हा तो थोडक्यात वाचला होता.

आता पुन्हा एकदा वाल्मीक कराड आणि अक्षय आठवले टोळी युद्धांचा भडका उडण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख यांचा अतिशय क्रूर पद्धतीने खून करण्यात आला होता. त्या खुनामुळे सबंध महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली होती. यामुळे धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता. या खुनातील संशयित म्हणून वाल्मीक कराड हा मुख्य आरोपी आहे.

वाल्मीक कराड याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे आणि अन्य नेत्यांची कनिष्ठ संबंध आहेत. बीडमध्ये त्यांची अनेक प्रकरणे उघड झाली होती. वाल्मीक कराड यांसह विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्णा आंधळे हे अन्य आरोपी आहेत. यातील कृष्णा आंधळे हा फरार आहे.

दरम्यान, देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपी सध्या परळीच्या कारागृहात आहेत. या कारागृहात वाल्मीक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांची बडोदास्त ठेवली जाते अशी तक्रार आहे. त्यामुळे यातील काही गुन्हेगारांना नाशिकला हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. आरपींना लवकरात लवकर फाशी देण्याची मागणी केली जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!