विषारी दारु पुरवठ्यावर फक्त चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन! पुणे शहर पोलिस दलाच्या कारवाईत ग्रामीणची कारवाई फिकीच…


उरुळी कांचन : पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारु पुरवठ्यात सहभागी असलेल्या हातभट्टी किंग राजू प्रजापतीशी अर्थिक तसेच वैयक्तिक संपर्क पोलिस चौकशीत उघड झाल्याने उरुळीकांचन पोलिस ठाणे व यवत पोलिस ठाण्यातील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश ग्रामीण पोलिस अधिक्षक संदिप सिंह गिल यांनी काढले आहेत. दै. पुढारीतून या पुरवठ्याची साखळी उजेडात आणल्यानंतर पोलिस दलातील खात्याअंतर्गत चौकशीनंतर या चौघांचे निलंबनाचे आदेश काढले आहेत.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरात विषारी दारुने १८ जणांहून अधिकांचा बळी घेतल्यानंतर या हातभट्टी दारुच्या पुरवठ्यात उरुळीकांचन येथील हातभट्टी दारु किंग राजू प्रजापती याचा सहभाग असल्याचे तपासात उघड झाल्यानंतर या हातभट्टी दारुचे पुरवठ्याचे कनेक्शन असलेल्या वस्तुस्थितीचा भांडाफोड दै. पुढारी च्या माध्यमातून करण्यात आला होता.

त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक संदिपसिंह गिल यांनी अप्पर पोलिस अधिकारी बारामती विभाग यांच्या अंतर्गत खातेअंतर्गत चौकशी करुन या धंद्यांशी संबंधित असलेल्या कनेक्शनची चौकशी केली होती. त्यानंतर या चौकशीत उरुळीकांचन पोलिस ठाण्यातील दोन व यवत पोलिस ठाण्यातील दोन अशा कर्मचाऱ्यांचा संपर्क उघडकीस आला आहे.

त्यानुसार उरुळीकांचन पोलिस ठाण्यातील अजित शिवाजी काळे आणि सुमित नंदकुमार वाघ तर यवत पोलिस ठाण्यातील रामदास ज्ञानदेव जगताप व सुभाष बलभिम डोईफोडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ कलम २५(२) नुसार या चौघांची निलंबनाची कारवाई अधिक्षक संदिपसिंह गिल यांनी काढली आहे. त्यानुसार निलंबनाच्या काळात या चौघांवर साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता लक्षात पोलीस मुख्यालय पाषाण येथे हजर राहण्याची शक्ती केलेली आहे. तसेच कार्यालय प्रमुखाच्या परवानगी शिवाय मुख्यालय सोडण्यास बंदी असेल असे निलंबनाच्या आदेशात नमूद केले आहे.

कारवाई म्हणजे ‘खोदा पहाड निकला चुहा’!

पुणे व पिंपरी चिंचवड पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी निलंबनाच्या कारवाईत ग्रामीण पोलिस दलाची कारवाई तर फारच जुजबी झाल्याची चर्चा आहे. हातभट्टी किंग राजू प्रजापती हा फक्त मोहरा असून अशा धंद्या करणाऱ्यांची मुख्यसाखळी तर कारवाईत कोसो दूर असल्याची चर्चा आहे. दारु पुरवठ्याचे कनेक्शन तर उरुळीकांचन येथून असेल तर कारवाई म्हणजे डोंगर पोखरुन उंदिर काढल्याची मजेशीर चर्चा परिसरात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!