आईसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा संशय अन् मित्रानेच मित्राचा काटा काढला, घटनेने राज्य हादरलं…


सोलापूर : आपल्याच आईसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयातून मित्रानेच आपल्या मित्राला संपवलं असल्याची घटना उघडकीस आली आहे. सोलापूरमधील मोहोळ तालुक्यात ही घटना घडली आहे. घटनेने एकच खळबळ उडाली आहे

आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्याने एका मित्रानेच आपल्या मित्राचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नेताजी तानाजी नामदे (वय ३२, रा. सौंदणे) या तरुणाचा विकास मारुती गुरव याने हत्या केली. हत्येनंतर त्याने मृतदेह शेतात पुरल्याची कबुली दिली.

ही घटना २४ ते २८ मे दरम्यान घडली आहे. नेताजी २४ मे रोजी गावातील गिरणीत दळण घेऊन गेला होता. मात्र तो घरी परतलाच नाही. यानंतर चिंताग्रस्त झालेले वडील तानाजी नामदे यांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल केली. स्थानिक नागरिकाने नेताजीला शेवटचं आरोपी विकास गुरवच्या घराजवळ पाहिल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांचा संशय विकासकडे वळला.

तपासादरम्यान, नेताजीने व्हॉट्सॲपवरून विकासला काही मेसेज पाठवले होते, हे पोलिसांना समजले. त्यानंतर विकासला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने हत्येची कबुली दिली. नेताजीला आपल्या आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्यानंतरच त्याने ही घृणास्पद कृती केली असल्याचे समोर आले.

दरम्यान, या प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक करून २ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!