Supriya Sule : राजकारणातील सर्वात मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे लोकसभेतून निलंबन…

Supriya Sule : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना निलंबित करण्यात आले आहे. संसदेत सुरक्षेच्या मुद्यावरून खासदारांनी आजही गृहमंत्र्यांच्या निवेदनाची मागणी केली. त्यानंतर गोंधळ उडाल्याने काही खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्यासह आणखी ४९ खासदार निलंबित करण्यात आले आहेत. सुप्रिया यांच्यासह डॉ. अमोल कोल्हे, मनिष तिवारी, कार्ती चिदंबरम, डिंपल यादव, दानिश अली, शशी थरूर अशा एकूण ४९ खासदारांचे निलंबन मंगळवारी करण्यात आले आहे.
सोमवारी सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते. संसदेच्या सुरक्षेत चूक झाल्याची जबाबदारी अमित शहा यांनी स्वीकारावी आणि राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरली. Supriya Sule
त्यानंतर सभापतींनी कारवाईचा बडगा उगारत लोकसभेतून ३३ आणि राज्यसभेतून ४५ खासदाराचं निलंबन केले होते. त्यात मंगळवारी आणखी काही खासदारांची भर पडली. मंगळवारी दोन्ही सभागृहातील मिळून १४१ खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे.