Supriya Sule : भाऊ- बहीण! सुप्रिया सुळे यांचा संसदेत उल्लेख, सभागृहात रंगली ‘ती’ चर्चा..


Supriya Sule नवी दिल्ली : आज लोकसभेत महिला आरक्षणावर चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या विषयावर चर्चा केली. यावेळी त्यांनी बहिणीचं कल्याण बघेल, असा भाऊ प्रत्येक घरात नसतो, असे वक्तव्य केले. खासदार सुळे यांच्या बोलण्याचा रोख कोणत्या भावावर होता, त्यांनी अमित शहांनाच हे का ऐकवले, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. Supriya Sule

मंगळवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला आरक्षण विधेयक मांडले. या विधेयकावर आज काँग्रेसकडून सोनिया गांधी यांनी प्रथम आपली भूमिका मांडली. नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या पक्षाचे मत मांडले.

दरम्यान, भाजपाकडून या विधेयकावर बोलण्यासाठी सर्वप्रथम पुरुष सदस्य निशिकांत दुबे यांना संधी देण्यात आली. यावर काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी आक्षेप घेतला.

अधीर रंजन म्हणाले, महिला आरक्षणावर बोलण्यासाठी भाजपाकडून पुरुष मंडळींना सर्वात आधी संधी दिली जात आहे. यावरून गृहमंत्री अमित शाह अधीर रंजन यांना उद्देशून म्हणाले, महिलांच्या मुद्द्यांवर फक्त महिलांनीच बोलावे का? महिलांच्या प्रश्नांवर पुरुष बोलू शकत नाहीत का? भावांनी महिलांच्या हिताचा विचार करणे आणि त्यावर बोलणे ही या देशाची परंपरा आहे.

अमित शहा यांच्या याच वक्तव्याचा पुरेपुर आधार घेत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, महिलांच्या हिताचा विचार भावांनी करावा, हे बरोबर आहे. पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, ज्यांना बहिणीचं कल्याण व्हावे असे वाटते . प्रत्येकाचे एवढे चांगले नशीब नसते. सुप्रिया सुळे यांनी नेमकी ही खंत कोणत्या बहिणीविषयी आणि कोणत्या भावाविषयी व्यक्त केली याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!