Supreme Court : ‘कोरेगावमूळ’ च्या सरपंचपदाची ‘सापशिडी’ अखेर संपुष्टात! सुप्रीम कोर्टात अखेर अविश्वासावर निवाडा..!!

Supreme Court उरुळी कांचन : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्या विरोधात १० विरुद्ध ३ मतांनी मंजूर झालेला अविश्वास ठराव सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविला आहे. ‘सरपंच’पदाची खुर्ची टिकविण्यासाठी व मिळविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत ‘सापशिडी’चा वापर करुन रंगलेला हा खुर्चीसंघर्ष आता संपुष्टात आला आहे.
कोरेगावमूळ ग्रामपंचायतीचे सरपंच विठ्ठल राजाराम शितोळे यांच्या विरोधात २१ फेब्रुवारी २०२३ रोजी ग्रामपंचायत सदस्यांनी आणलेला ठराव १० विरुद्ध ३ मतांनी मंजूर झाला होता. Supreme Court
या ठरावाविरुध्द सरपंच विठ्ठल शितोळे यांनी तीन ग्रामपंचायत सदस्यांनी मुदतीत जातपडताळणी दाखल केली नाही म्हणून? त्यांचे सदस्यत्व रद्द करुन झालेला ठराव हा अवैध असल्याचा मुद्दावर जिल्हाधिकारी, पुणे , उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी अपिल करुन दाद माघण्याचा प्रयत्न केला होता.
१ डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुणावणी होत उच्च न्यायालयाने सरपंच विठ्ठल शितोळे यांची अपिल फेटाळली होती. त्यानंतर सरपंच विठ्ठल शितोळे यांनी थेट सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल करीत शेवटचा ही पर्याय अवलंबून पाहिला.
यावर सर्वोच्च न्यायालयाने (दि. १२) डिसेंबर रोजी या अपिलाची सुणावणी घेत तात्काळ हे प्रकरण निकाली काढीत मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे आता कोरेगाव मूळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या नऊ महिने सुरू असलेल्या ‘संगीत’ खुर्चीचा अखेर निकाल लागला आहे.