Sunetra Pawar : निवडणुकीच्या मैदानात सुनेत्रा पवारांनी फोडली डरकाळी! म्हणाल्या, बारामतीची सून म्हणून सांगते…


Sunetra Pawar : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरत असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सध्या रंजक घडामोडी सुरु आहेत. कन्हेरीच्या मारोती मंदिरात नाराळ फोडत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे.

बारामती लोकसभा मतदार संघाची सून म्हणून एकच सांगते. आपल्या आवडत्या चिन्हाला मतदान करुन बारामतीची सून म्हणून मला विजयी करावं. कन्हेरीचा मारोती कायम माझ्या पाठीशी राहिलाय आणि पुढेही राहणार, असा विश्वास बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवारांनी व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा नारळ फोडला. कन्हेरीच्या मारोती मंदिरात नाराळ फोडत अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी कामंं केली ती सगळ्या जगापुढे आहे. देशात मोदी एके मोदी असा नारा आहे. सगळ्या योजना प्रत्येकापर्यंत पोहचल्या आहे. त्यांची कार्यक्षमता पाहून देश एका वेगळ्या स्थानावर पोहचलं आहे.

देशातील मोदींचे काम पाहून विकास पाहून त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे महायुतीच्या बारामतीच्या उमेदवाराला म्हणजेच मला विजयी करा, असं आवाहन सुनेत्रा पवारांनी बारामतीकरांना केलं आहे.

सुनेत्रा पवार म्हणाल्या की, नव्या राजकीय पर्वाची सुरुवात असताना अजित पवार माझ्या पाठीशी उभे आहेत. त्यांच्या माझ्यावर विश्वास आहेच मात्र जास्त विश्वास तुमच्यावर आहे. तुमच्या सगळ्यांच्या वहिनींना काम करताना जबबादारीची जाणीव आहे. सगळ्या अपेक्षा पूर्ण करेन असा विश्वास त्यांनी बारामतीकरांनी दिला. Sunetra Pawar

तुम्ही सगळेच अजित पवारांच्या पाठीशी आहात आणि राहणार आहात मात्र त्यांच्यामुळे मलाही पाठिंबा देणार यांची खात्री आहे. आपले सहकारी विजय शिवतारे आणि बाकी सहकाऱ्यांच्या सोबत येण्याने वज्रमुठ पक्की झाली आहे. हे सगळे सहकारी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहे. त्यामुळे वज्रमुठ आणखी घट्ट राहणार आहे. विजय हा आपला निश्चित आहे, असे म्हणत त्यांनी विजयाची खात्री दिली.

दरम्यान, मागील १० वर्षात मी अनेक कामं केलीत. विद्या प्रतिष्ठानामार्फत अनेक विद्यार्थ्यांसाठी काम केलं आहे. गोरगरिबांचीच नाही तर अनेकांसाठी काम केले आहे. त्यामुळे येत्या काळातदेखील हे कामं करायची संधी मला मिळावी, अशी अपेक्षा आहे. तुमच्या सगळ्या अपेक्षा मी पूर्ण करेन, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!