विश्वव्यापी मानवधर्म आश्रमाचे अध्यक्ष सुमंत बापू हंबीर यांचे दुःखद निधन; अध्यात्म व समाजकार्य क्षेत्रावर शोककळा


दौंड : पाठेठाण (ता.दौंड) येथील विश्वव्यापी मानवधर्म आश्रमाचे अध्यक्ष पूज्य सदगुरु श्री सुमंत बापू हंबीर यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच परिसरात शोककळा पसरली आहे.

अध्यात्म, मानवसेवा आणि समाजकार्य क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. आयुष्यभर त्यांनी मानवधर्म, सदाचार आणि निःस्वार्थ सेवेला प्राधान्य देत समाजाला दिशा देण्याचे कार्य केले.

त्यांच्या निधनामुळे आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा पुढील पिढ्यांसाठी कायम मार्गदर्शक ठरेल, असे भावनिक उद्गार व्यक्त केले जात आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!