विद्यार्थ्यांची उत्सुकता शिगेला! थोड्याच वेळात जाहीर होणार दहावीचा निकाल, ‘या’ वेबसाईटवर पाहता येणार निकाल..

पुणे : आज, १३ मे रोजी महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल लागणार आहे. दुपारी एक वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे गुण कळणार आहेत. यंदा राज्यभरातून एकूण १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
आज सकाळी पुण्यात बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी हे पत्रकार परिषद घेऊन निकाल जाहीर करतील. आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद होणार असून, निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना थेट संकेतस्थळांवर दुपारी १ वाजल्यापासून ऑनलाईन प्रवेश मिळेल. शालेय जीवनाचा पहिला मोठा टप्पा पार करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचे निकाल आज, मंगळवारी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर ऑनलाइन पद्धतीने निकाल पाहता येतील, असे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले. निकाल पाहण्यासाठी तुम्ही खालील संकेतस्थळावर भेट देऊ शकता.
विद्यार्थ्यांना खालील अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येणार निकाल..
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
https://results.targetpublications.org