मोठी बातमी! दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के, लोक घराबाहेर पळाले; इमारती हादरल्या अन्…


नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सुमारे १० सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी सकाळी ९.०४ वाजता भूकंपाचे धक्के बसले. हे धक्के दिल्ली, नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरीदाबाद, रोहतक, हिसार आणि सोनीपत या परिसरात जाणवले.

भूकंपाचे केंद्र हरियाणातील झज्जर होते. येथे रिश्टर स्केलवर तीव्रता ४.४ होती. त्यामुळे दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, 19 एप्रिल रोजी दुपारी अफगाणिस्तानात रिश्टर स्केलवर ५.८ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याचा परिणाम जम्मू-काश्मीर आणि दिल्ली-एनसीआरपर्यंत जाणवला.

तथापि, कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या मते, जम्मू-काश्मीरच्या काही भागातही भूकंपाचा परिणाम जाणवला. श्रीनगरमधील एका व्यक्तीने सांगितले की, मला भूकंप जाणवला. मी ऑफिसमध्ये होतो, तेव्हा माझी खुर्ची हादरली. काही भागात लोक घरे आणि ऑफिसमधून बाहेर पळताना दिसले.

दरम्यान, नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, भूकंप जमिनीपासून ८६ किलोमीटर खाली झाला. त्याचा केंद्रबिंदू अफगाणिस्तान-ताजिकिस्तान सीमावर्ती भागात होता. हा परिसर भूकंपांसाठी संवेदनशील मानला जातो. या भागात भूकंप होणे सामान्य आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!