राज्यात खळबळ!! डॉक्टरांनी जिवंत रुग्णाला मृत घोषित केलं, घरी अंत्यविधीची तयारी सुरू असताना रुग्ण जिवंत झाला आणि..


उल्हासनगर : याठिकाणी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे शिवनेरी हॉस्पिटलमध्ये अभिमान तायडे (वय 65) या जिवंत असलेल्या व्यक्तीस मृत घोषित करून डॉक्टरांनी चक्क त्यांना डेथ सर्टिफिकेट दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे आता आरोग्य क्षेत्रावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

याबाबत माहिती अशी की, अभिमान तायडे यांची प्रकृती काही काळापासून ठिक नसल्याने त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ते बेशुद्ध झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मुलाने उल्हासनगर येथील शिवनेरी रुग्णालयात घेऊन गेला. याठिकाणी डॉ.आहुजा यांनी रिक्षामधूनच रुग्णाची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

त्यांना डेथ सर्टिफिकेट देण्यात आले. घरी अंत्यसंस्काराची तयारी सुरू असताना, नातेवाईकांच्या लक्षात आले की अभिमान यांच्या छातीची धडधड सुरू आहे. तेव्हा तातडीने त्यांना उल्हासनगरमधीलच एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामुळे धक्कादायक प्रकार समोर आला, रुग्ण हे जिवंत होते.

डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू करताच अभिमान तायडे पुन्हा शुद्धीवर आले. त्यांना वाचवण्यात यश आल्याने नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडला, पण त्याचबरोबर शिवनेरी रुग्णालय व डॉ. आहुजा यांच्याविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. आता हे रुग्ण ठणठणीत असून या घटनेमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, डॉ. आहुजा यांनी चूक झाल्याचे मान्य केले आहे. रुग्णाची नस मिळाली नाही, तसेच आजूबाजूला गोंगाट असल्याने हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच चुकीने मृत घोषित केले, याबद्दल खेद व्यक्त केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!