राज्य सरकारचे फर्मान निघाले! मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीवर ‘प्रशासक’ नेमण्याचे आदेश


पुणे:राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीबाबत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.जानेवारी 2026 पासून ते डिसेंबर 2026 पर्यंत अनेक ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपणार आहे. अशा मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

ग्रामपंचायतमध्ये प्रशासक नेमण्याच्या तरतुदी बाबतच एक महत्त्वाचे पत्र राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अवर सचिव महाराष्ट्र यांच्याकडून ते देण्यात आल आहे. त्यानुसार आता संबंधित ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही केली जाणार आहे.

सरकारच्या आदेशानुसार, उच्च न्यायालयाने मुदत संपलेल्या किंवा संपणार्‍या ग्रामपंचातीवर प्रशासक नियुक्त करण्याची परवानगी दिली आहे.ही नियुक्ती ग्रामपंचायत निवडी पूर्वी किंवा नवीन पंचायत अस्तित्वात येईपर्यंत करणे अनिवार्य आहे. दरम्यान मुदत संपणाऱ्या किंवा नव्याने तयार होणाऱ्या ग्रामपंचायतसाठी निवडणूक होईपर्यंत प्रशासक नेमला जाईल आणि प्रशासक नियुक्त करताना उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेण्याचे विशेष निर्देश दिले आहेत.

राज्यातील ग्रामपंचायतीचा कारभार सुरळीत पार पाडावा यासाठी मुदत संपण्याआधी प्रशासक नेमावा असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!