ST Bus Strike : अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला, वेतनात 6500 रुपयांची वाढ, आजपासून नियमित बस सुरू..

ST Bus Strike : आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं होते. अखेर एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृहात, एसटी कर्मचारी संघटना कृती समितीसह बैठक पार पडली.
या बैठकीत काय तोडगा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं होते. अखेर एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात तब्बल ६५०० रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्यामुळे कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल होतायत.
तसेच काही गावांमध्ये एकही एसटी डेपोतून बाहेर निघत नसल्यानं गावकरी, विद्यार्थ्यांची मोठी कोंडी झाली होती. संप मागे घेतल्याने राज्यभरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. ST Bus Strike
एसटी कामगार संघटनांनी दिलेले पत्र आणि मागण्या यामध्ये तफावत होती. त्यामुळं मंगळवारी निर्णय घेता आला नाही. मात्र एसटी कामगार संघटनांची आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांसोबत बेठक झाली.
या बैठकीतून मुख्यमंत्र्यांनी कामगारांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक निर्णय घेतला. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असताना त्याबद्दल कुणी राजकारण करू नये, असं सामंतांनी विरोधकांना सुनावले होते.