सोरतापवाडीचा डिजीटल स्मार्ट व्हिलेज योजनेत समाविष्ट केला ; आता स्मार्ट नर्सरी हब करुन दाखवू – आमदार ज्ञानेश्वर कटकेंचे सोरतापवाडीत अभिवचन ….!

उरुळी कांचन : जिल्ह्यात बारामती तालुक्यात काटेवाडी व हवेली तालुक्यात सोरतापवाडी ग्रामपंचायतीचा स्मार्ट डिजीटल व्हिलेज योजनेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार समाविष्ट करण्यात आला आहे.भविष्यात सोरतापवाडीत नर्सरी हब करण्याचा संकल्प पूर्ण करणार असल्याचे स्पष्टीकरण शिरुर-हवेलीचे आमदार,ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांनी दिले आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर उरुळीकांचन – सोरतापवाडी जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र बडेकर व पंचायत समितीचे उमेदवार आण्णा महाडीक यांच्या प्रचारार्थ सोरतापवाडी (ता.हवेली)येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार ज्ञानेश्वर कटके बोलत होते.या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचे उमेदवार बहुमताने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
आमदार ज्ञानेश्वर कटके म्हणाले , जिल्ह्यात जिल्हा परिषदेवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व असल्याने जिल्ह्यातील वाडी -वस्त्यांवर रस्ते, पाणी व आरोग्य सुविधा पोहचविण्यात आल्या आहेत. गुणवत्तापूर्ण विकासकामे पूर्ण होण्यासह शिक्षण,आरोग्य व कुटूंब नियोजन व लाभार्थी योजनांनी सर्व घटकांना ते न्याय देत आहे.

बारामतीत ज्याप्रमाणे स्वतः चे काटेवाडी गाव हे डिजिटल स्मार्ट व्हिलेज योजनेत सामाविष्ठ केले. त्याचप्रमाणे ते आपल्या मतदारसंघातील सोरतापवाडी गाव त्यांच्या प्रयत्नांनी डिजिटल स्मार्ट व्हिलेज होणार असून माहिती, तंत्रज्ञान तसेच शेतीविषयक प्रगत तंत्रज्ञान प्रयोगिक तत्त्वावर गावात राबविण्यात येऊन गावचा चेहरामोहरा बदलणार आहे. त्याचबरोबर हे गाव नर्सरी हब म्हणून विकसित करुन सर्व शासकीय मदतया ठिकाणी उभी करणार असल्याचे ते म्हणाले.
या नियोजन बैठकीत उमेदवार जितेंद्र बडेकर, आण्णा महाडीक, ‘यशवंत’चे संचालक शशिकांत चौधरी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र चौधरी,माजी उपरसरपंच राजेंद्र तानाजी चौधरी, नेते अमित चौधरी, अजिंक्य चौधरी, अमोल चौधरी, सुहास चोरघे, नानासो चोरघे, सचिन चौधरी, बंडू चौधरी ,संतोष चौधरी, प्रशांत चौधरी तसेच पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.