Someshwar Factory : सोमेश्वर कारखान्याचा राज्यात डंका! उसाला ३७७१ रुपये दिला दर…

Someshwar Factory : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने संपलेल्या हंगामाकरता राज्यातील सर्वाधिक उच्चांकी दर जाहीर केला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा कारखाना कामकाज करतो.
याबाबत प्रति मेट्रिक टन ३५७१ रुपये उच्चांकी दर जाहीर केला आहे. संपूर्ण राज्यात एफआरपी पेक्षा प्रति मेट्रिक टन 697 रुपये जास्त दर जाहीर केला आहे. अनुदानासह हा दर 3771 रुपये मिळणार आहे. याबाबत कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी माहिती दिली.
संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये या सर्वोच्च ऊसदरारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. जानेवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसाला प्रति मेट्रिक टन 75 रुपये, उसाला प्रति मेट्रिक टन 100 रुपये, मार्चमध्ये तुटलेल्या ऊसाला प्रतिमेटीन 150 रुपये व त्यानंतर हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या उसास प्रति मेट्रिक टन 200 रुपये अनुदानासह दर जाहीर केला आहे.
कारखान्याने कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पातून 10 कोटी 49 लाख 51 हजार युनिटची वीज निर्मिती केली आहे. तब्बल 5 कोटी 82 लाख 17 हजार 604 युनिटची वीज विक्री देखील केलेली आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. Someshwar Factory
कारखान्याच्या आसवनी प्रकल्पातून 1 कोटी लिटर अल्कोहोलचे उत्पादन घेतले असून 40 लाख 73 हजार 773 लिटर इथेनॉलचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याची सन 2023 – 24 हंगामाची एफ आर पी सरकारी धोरणानुसार 2873.98 प्रति मेट्रिक टन एवढी येत होती. असे असताना कारखान्याने आज अखेर सभासदांना 3100 रुपये प्रति टनी या दराने सभासदांच्या खात्यावर ऊस दराचा हप्ता वर्ग केला होता.
जगताप म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वैयक्तिक कारखाना प्रशासनावर असणारे काळजीपूर्वक लक्ष व त्यांचे वेळोवेळीचे मार्गदर्शन तसेच संचालक मंडळाचा काटकसरी व उत्तम नियोजनपूर्वक कारभार यामुळे सोमेश्वर कारखाना यावर्षी देखील उच्च दराची परंपरा कायम राखू शकला.