Solapur Crime News : शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानं महिलेचे तरुणासोबत भयंकर कृत्य, बार्शीतील घटना..


Solapur Crime News : सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेने एका व्यक्तीचे गुप्तांग कापल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

या प्रकरणी युवकाने दिलेल्या तक्रारीवरून महिलेवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी संशयित महिलेस अटक करून न्यायालयात हजर केले असता या महिलेस चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, जखमी तरुणाचे मोबाइलचे दुकान आहे. तर यातील संशयित आरोपी महिला या दुकानात कायम येत-जात असल्याने त्यांच्यात ओळख निर्माण झाली आणि कालांतराने त्यांच्यात प्रेमसंबंध जुळले होते. नंतर त्या महिलेने युवकाकडे लग्न करण्याचा हट्ट धरला.

मात्र महिला आधीच विवाहित असल्याने युवकाने लग्नासाठी नकार दिला. मात्र, संशयित आरोपी महिला ही ब्लॅकमेल करू लागली. त्यातूनच मार्च २०२३ मध्ये त्याच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे बलात्काराचा गुन्हा देखील दाखल केला. या प्रकरणात युवकाला तुरुंगात जावे लागले.

जवळपास दोन महिन्यांनी जेलमधून बाहेर आल्यानंतरही तिचे ब्लॅकमेलिंग सुरूच राहिले. दरम्यान, त्याच्या वडिलांवर आणि भावांवर देखील छेडछाडीचे गुन्हे दाखल केले.दरम्यान, शेवटी या महिलेच्या त्रासाला कंटाळून ऑगस्ट २०२३ मध्ये युवकाने आळंदी येथे तीच्यासोबत लग्न केले. Solapur Crime News

मात्र त्यानंतरही ती महिला या युवकाजवळ न राहता त्याचा छळ करतच राहिली, त्याच्याजवळ राहत नसतानाही मोबाइलद्वारे आणि दुकानात जाऊन ही महिला त्याला त्रास देऊ लागली. तिच्या त्रासाला वैतागून युवकाने आपले राहते घर सोडून ३ महिन्यांपूर्वी तो बार्शी तालुक्यात नातेवाइकाकडे राहण्यास गेला. तेव्हापासुन दोघातील संपर्क तुटला होता.

दरम्यान गुरुवार २१ मार्च २०२४ रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास या महिलेने समाज माध्यमावरील अकाउंटवरून युवकाला फोन केला. त्याला धमकी देत गुरुवारी दुपारी २. ३० वाजता बार्शी एस.टी. स्टॅन्डवर भेटण्यासाठी बोलावले.

तेथून ते दोघेही तेथीलच साई समर्थ लॉज येथे गेले. तेथे गेल्यावर महिलेने शरीर संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याने नकार दिला, तरीही महिलेने बळजबरी त्याचे कपडे काढले. तोंडावर शर्ट टाकून अचानकपणे गुप्तांगवर चाकूने वार केले.

अचानक झालेल्या हल्याने युवकाला गंभीर इजा झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होतं असल्याने युवकाने बार्शीतील खासगी रुग्णालय गाठले. सध्या इथे त्याचावर उपचार करण्यात येत आहे.

या प्रकरणी जखमी युवकाने पोलिसात देलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी महिलेविरोधात हत्येच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास बार्शी पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!