सियाचे सहा महिन्यात २००४ वेळा चेतनशी फोन ; साखरपुडा केतनशी पण ‘हनिमून’ दुसऱ्यासोबतच…

लोहगड : लोहगड किल्ल्यावर १८ जून रोजी घडलेली घटना ही केवळ एक दुर्दैवी अपघात नसून तो एक अत्यंत क्रूर आणि नियोजनबद्ध खून असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. २६ वर्षीय केतन अग्रवाल याचा किल्ल्यावरील कठड्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला सर्वांनाच हा एक अपघात वाटला होता, परंतु पोलीस तपासाने या प्रकरणाला पूर्णपणे वेगळे वळण दिले आहे. केतनची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी मिळून त्याला दरीत धक्का दिला आणि त्याची हत्या केली, असे आता निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासणीत सिया आणि चेतन यांच्यातील धक्कादायक संबंधांचा पर्दाफाश झाला. केतनसोबत लग्नाची बोलणी सुरू असतानाही सिया गेल्या काही वर्षांपासून चेतनच्या प्रेमात होती. त्यांच्या कॉल डिटेल्सवरून असे दिसून आले की, केवळ ६ महिन्यांत त्यांच्यात तब्बल 2004 वेळा फोनवरून संवाद झाला होता. दररोज सरासरी 11 ते 12 वेळा आणि एकूण 14,280 मिनिटे ते एकमेकांशी बोलत होते. केवळ फोनवरच नाही, तर ते अनेकदा एकमेकांना भेटत असत आणि लग्नापूर्वीच हनिमूनला गेल्याची माहिती समोर येत आहे.
केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी या प्रकरणी सियाच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, सियाचे पूर्वीपासूनच अनेक तरुणांशी संबंध होते आणि हे तिच्या घरच्यांनाही माहित होते. तरीही, लग्न झाल्यावर मुलगी सुधारेल या आशेपोटी तिचे कुटुंबीय आणि आम्ही ही सोयरीक केली होती. गोयल कुटुंबाने सियाचे वागणे आमच्यापासून लपवून ठेवल्यामुळेच माझ्या मुलाला आपला जीव गमवावा लागला, अशी खंत विशाल अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.

सध्या या धक्कादायक हत्याकांडाचा पोलीस अधिक तपास करत आहेत. आरोपी सिया आणि चेतन यांच्या या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अशा प्रकारच्या फसवणुकीच्या आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.
