घोडगंगा कारखान्यासाठी ‘एनसीडीसी’चा प्रस्ताव वाढविण्याची मागणी; आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट…


उरुळीकांचन : शिरुर तालुक्यातील रावसाहेब पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या ‘एनसीडीसी’च्या अर्थिक पॅकेजच्या प्रलंबित प्रश्नासह मतदारसंघातून हडपसर ते यवत व विमाननगर ते शिरुर पर्यंत उन्नत मार्ग उड्डानपूलाच्या कामाच्या पार्श्वभूमीवर आरपी रस्त्यांसाठी निधीची तरतूद करण्यासाठी शिरुर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे.

शिरुर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना अर्थिक अडचणीत सापडून सलग ३ वर्षे बंद अवस्थेत आहे. या कारखान्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून १८३ कोटी रुपये एनसीडीसी मार्फत उपलब्ध व्हावे म्हणून हा प्रस्ताव शासन स्तरावर प्रलंबित आहे. या प्रस्तावातूनच अधिक स्वरुपाचा ३०० कोटी रुपये अधिकचा कर्जाचा प्रस्ताव मंजूर व्हावा अशी मागणी आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली आहे.

तसेच हडपसर ते यवत व विमाननगर ते शिरुर या दरम्यान सुरू होणाऱ्या उन्नत मार्गाच्या इलिव्हेटेड उड्डानपूलाच्या कामासाठी या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील पर्यायी वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होणार असल्याने या महामार्गालगत आरपी रस्ते तयार करण्यासाठी पीएमआरडीए सूचना करुन तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!