Sindhudurg : राज्यात अजून एक बोट उलटून मोठी दुर्घटना, २ जणांचा मृत्यू तर २ जण बेपत्ता…


Sindhudurg : वेंगुर्ल्यातही बोट बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागच्या दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सिंधुदुर्गात पडत आहेत. वेंगुर्ले बंदरात रात्री मच्छिमार बोटींना लागणार बर्फ घेऊन जात असलेली बोट उलटली.

एकूण सात खलाशी बोटी वर होते त्यातील तिघांनी पोहून किनारा गाठला. बोट उलटल्यानंतर चार जण बेपत्ता होते, त्यातील दोघांचे मृतदेह सापडले असून दोघे अद्याप बेपत्ता आहेत, शोध मोहीम सुरु आहे.

रात्री ढगांचा गडगडाट जोरदार वादळी वारे अशी परिस्थिती असल्यामुळे ही बोट भरकटल्याने हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. बेपत्ता असलेल्या खलाश्या पैकी १ खलाशी रत्नागिरीतील तर ३ खलाशी मध्यप्रदेशातील असल्याची माहिती आहे.

दरम्यान, हा आठवडा घातवार ठरला आहे. आधी उजनी जलाशयात बोट उलटून ६ प्रवासी गेले तर त्यानंतर नगरमध्ये चार जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यापाठोपाठ आता वेंगुर्ल्यातही बोट बुडाल्याची घटनेने खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!