मकरसंक्रांतीला सोने-चांदीचा ‘भडका’! चांदी तब्बल १५ हजारांनी महागली; सोन्याच्या दरातही तेजी कायम, जाणून घ्या आजचे दर…


पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. आणि गेल्या आठवडाभरात त्यात झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सोनं खरेदी करावं की नको असा सवाल नागरीकांमधून उपस्थित केला जात आहे.

सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आहे. अशातच आता मकरसंक्रांतीच्या सणाला ‘तिळगुळ घ्या आणि गोड बोला’ असे म्हटले जात असले, तरी सराफा बाजारातून आलेली बातमी मात्र ग्राहकांसाठी कडू ठरली आहे. मकरसंक्रांतीच्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत अनपेक्षित आणि मोठी वाढ झाली आहे.

सोने आणि चांदीच्या किमती वाढतच आहेत. आज COMEX वर सोने प्रति औंस $4,613.90 वर पोहोचले, मागील काही दिवसांपासून Gold And Silver Rate तूफान वाढ होताना दिसते नाहीतर एकदम घसरण होताना दिसते. आज वायदे बाजारात पुन्हा एकदा तेजीचे संकेत पाहायला मिळाले.

सोन्याच्या वायद्यात इतकी वाढ झालेली नाही, पण चांदीने मात्र आज मार्केट उघडताच शुभ संकेत दिले आहे. सोन्याचा वायद्याची 1,42,968 रुपये इतकी झाली आहे. चांदीच्या वायद्याची किमत ही 2,82,499 रुपये इतकी आहे. चांदीच्या वायद्याच्या किमतीत आज थेट 7,000 रुपयांनी वाढली आहे.

आज सोने आणि चांदीच्या किमतीत वाढ दिसून येत आहे, विशेषतः चांदी. काल, चांदीने प्रति किलोग्रॅम ₹2,70,000 ओलांडले आणि आज, आंतरराष्ट्रीय बाजारात किमती नवीन उच्चांक गाठल्या आहेत. भारतात आज 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम ₹1,42, 540वर पोहोचली.

याशिवाय, आज 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 130,660 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 106,910 रुपये झाला. चांदीचा भाव आज प्रति किलोग्रॅम 275,100 रुपये झाला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!