प. बंगाल, केरळ, तामिळनाडूत सत्तांतराचे संकेत; ‘थलपती’ विजयची ऐतिहासिक झेप, ममतांचा किल्ला धोक्यात


नवी दिल्ली : देशातील पाच महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत मोठे राजकीय उलथापालथीचे संकेत मिळत आहेत. पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुचेरी या राज्यांमध्ये सुरू असलेल्या मतमोजणीत धक्कादायक ट्रेंड समोर आले आहेत.

पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराचे संकेत

पश्चिम बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांनुसार भाजपने मोठी आघाडी घेतली असून पक्ष 150 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा फटका बसताना दिसत असून पक्ष 100 च्या खाली घसरला आहे.

294 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 148 जागांची गरज असताना भाजप 154 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यात सत्तांतराची शक्यता प्रबळ झाली आहे.

तमिळनाडूत ‘विजय फॅक्टर’चा प्रभाव

तमिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल दिसत आहे.

अभिनेता-राजकारणी विजय यांच्या ‘तामिळगा वेट्री कळगम’ (TVK) पक्षाने 100+ जागांवर आघाडी
AIADMK – 74 जागांवर
मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचा DMK पक्ष तिसऱ्या क्रमांकावर

गेल्या 50 वर्षांपासून DMK–AIADMK या दोन पक्षांचे वर्चस्व असलेल्या राज्यात आता त्रिकोणी लढत निर्माण झाली आहे.

केरळमध्ये काँग्रेसची मजबूत कामगिरी

केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF आघाडी निर्णायक बहुमताच्या दिशेने वाटचाल करत आहे.

UDF – 93 जागांवर आघाडी
LDF – 44 जागांवर

बहुमतासाठी 71 जागांची गरज असताना काँग्रेस स्पष्ट आघाडीवर आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन हेही पिछाडीवर असल्याचे चित्र आहे.

आसाममध्ये भाजपची हॅट्ट्रिक?

आसाममध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडी बहुमताचा आकडा पार करताना दिसत आहे.

BJP – 99 जागांवर आघाडी
बहुमतासाठी गरज – 64

या ट्रेंडनुसार भाजप सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

पुदुचेरीत भाजप आघाडी मजबूत

पुदुचेरीमध्ये भाजप आघाडी 22 जागांवर आघाडीवर असून बहुमताचा आकडा (16) पार केला आहे. त्यामुळे येथेही सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!