राष्ट्रवादीत महत्त्वाच्या घडामोडी! पार्थ पवारांनी बोलावली आमदारांची बैठक; जिजाई निवासस्थानी किती आमदार दाखल?


पुणे : राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. दिवाळीपासून या विषयाला वेग आला असून, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात झालेल्या चर्चेतील एका विधानामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. अशातच आता पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडत असल्याची माहिती समोर आली आहे.

मागील आठवड्यात शरद पवार रुग्णालयात दाखल असताना प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी ’10 तारखेनंतर बोलू’ असे म्हटल्याची माहिती समोर आली. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबतच्या चर्चांना अधिकच वेग आला.

दरम्यान, पुण्यात पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडक आमदारांची आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. दिवंगत नेते अजित पवार यांच्या जिजाई निवासस्थानी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी सात आमदार उपस्थित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

पार्थ पवार यांच्या उपस्थितीत जिजाई निवासस्थानी आमदारांची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला मंत्री दत्तात्रय भरणे, शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके आणि भोरचे आमदार शंकर मांडेकर उपस्थित असल्याची माहिती आहे. आमदार शंकर मांडेकर बैठकीसाठी दाखल झाले आहेत.

विशेष म्हणजे, सुनेत्रा पवार यादेखील या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या बैठकीत नेमकी कोणती चर्चा होते आणि त्यातून काय निर्णय समोर येतो, याकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!