हवेलीत खरेदी-विक्री संघाची “निवडणूक”; चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! प्रकाश जगताप विरुद्ध प्रशांत काळभोर यांचा परस्परविरोधी ठोकला शड्डू…

जयदिप जाधव उरुळीकांचन : हवेली तालुका खरेदी विक्री संघाच्या स्थापनेच्या चार दशकांच्या प्रदिर्घ कार्यकाळात पहिल्यांदाच हवेली तालुका खरेदी विक्री संघाची निवडणुक तालुक्यात लागण्याची वेळ तालुक्यावर आली आहे.तालुक्यात सहकार क्षेत्रातील पुणे बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एकसंध असलेल्या गटातच राजकीय प्रतिष्ठेचा ‘वार’ परस्परांविरोधात कुरघोडीच्या रुपात घडू लागल्याने तालुक्यातील गटाबाजीचे राजकीय समीकरणे पुन्हा उफाळून आले असून पुणे बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप व बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या भोवती समर्थकांनी निवडणुकीला हवा घातल्याने हवेली तालुका खरेदी विक्री संघाची निवडणुक आता ३०३ मतदानात रंजक ठरणार असल्याचे निश्चित झाले आहे.

पुणे बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणुक एकत्र पॅनेल करुन लढणाऱ्या सभापती प्रकाश जगताप व संचालक प्रशांत काळभोर राजकीय वितुष्ठ निर्माण झाल्याने तालुक्यात प्रतिष्ठेच्या मुद्दाची झळ पहिल्यांदाच इतिहासात निवडणुकीच्या रुपाने तालुक्याला पहायला मिळाली आहे. संघाच्या स्थापनेपासून जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के यांच्या ताब्यात असलेल्या या संघाची सूत्रे प्रशांत काळभोर यांच्या ताब्यात राहिली आहे. अनेकवेळा संघाच्या निवडणुकीत एकमत होऊन ही संस्था एकहाती बिनविरोध होण्याची परंपरा होती. मात्र तालुक्यातील पुणे बाजार समिती व यशवंत सहकारी साखर कारखान्यातील बदलती सूत्रे हवेली खरेदी विक्री संघावर पडली आहेत.

हवेली तालुका खरेदी विक्री संघाची अनपेक्षित निवडणुक आता रंजक थरावर जाऊन पोहचली असून एकेकाळी प्रकाश जगताप यांचे निकटवर्तीय असलेले जिल्हा बँकेचे प्रदिप कंद हे त्यांच्या विरोधात ‘धार’ लावून बसले आहेत. तर त्यांना दुसरे जिल्हा बँकेचे तज्ञ संचालक सुरेश घुले यांनी साथ दिली आहे. तर प्रकाश जगताप यांच्यासोबत जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट हे ठाण मांडून असल्याने बदलत्या घडामोडींत तालुक्याची निवडणुक ‘बदले’ की भावनेने प्रेरीत झाली आहे.

हवेली तालुका खरेदी विक्री संघात हे सर्व दिग्गज त्वेषाने मैदानात उतारल्याने संस्था प्रतिनिधी गटात मातब्बर उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर वैयक्तिक प्रतिनिधी गटात खुद्द प्रशांत काळभोर, प्रकाश म्हस्के यांचे बंधू शेखर म्हस्के तर त्यांच्याविरोधात ज्येष्ठ नेते माधव काळभोर यांचे ज्येष्ठ बंधू सुर्यकांत काळभोर व सोरतापवाडीचे माजी सरपंच सागर चौधरी यांचे निकटवर्तीय विराज काळभोर हे सभापती प्रकाश जगताप यांच्या पॅनेलमधून मैदानात उतल्याने या दिग्गजांनी निवडणुकीची उत्कंठा वाढविली आहे.
दोन्ही पॅनलमध्ये अनुभवी आणि राजकीय वजन असलेल्या नेत्यांचा समावेश असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, आगामी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनेही या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणत्या पॅनलला सभासदांचा कौल मिळतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सभापती प्रकाश जगताप व जिल्हा बँकेचे संचालक विकास दांगट यांच्या नेतृत्वाखाली
अण्णासाहेब मगर परिवर्तन पॅनलचे उमेदवार
संस्था प्रतिनिधी : रामदास सहादू दांगट, राजेंद्र ज्ञानेश्वर खांदवे, सुभाष सदाशिव टकले, सुभाष ज्ञानोबा कांचन, हनुमंत काळुराम हरगुडे, साईनाथ रामराव वाळके, कृषीराज दत्तात्रय चौधरी, तुषार बापुसो कुटे, राजेंद्र किसन कोंडे आणि शरद गोपाळ भालेकर.
वैयक्तिक सभासद प्रतिनिधी : विराज सुभाषराव काळभोर, प्रविण सुभाष खांदवे, सूर्यकांत दत्तात्रय काळभोर आणि सोमनाथ गोविंद खांदवे.
महिला प्रतिनिधी : कल्पना शिवाजी खटाटे आणि सुशिला राजाराम कदम.
इतर मागास प्रवर्ग : भरत दत्तात्रय काळभोर.
भटक्या-विमुक्त जाती प्रवर्ग : भगवान शंकर मडदे.
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग : विनायक लक्ष्मण कांबळे.
जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप कंद , सुरेश घुले,माजी संचालक प्रकाश म्हस्के व पुणे बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या नेतृत्वाखाली
सहकार महर्षी अण्णासाहेब मगर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार
संस्था प्रतिनिधी : कल्याण अंकुश शिंदे, संजय सोपान गायकवाड, चैतन्य कैलास जोरी, प्रकाश अमृत सावंत, युवराज पंडितराव कांचन, प्रदीप खंडू आहेर, गुलाब भागुजी चौधरी, बाळासाहेब शिवाजीराव पोकळे, अश्विनी सुखदेव भोरडे आणि तेजस नंदकुमार कोकाटे.
वैयक्तिक
सभासद प्रतिनिधी : प्रशांत दत्तात्रय काळभोर, महेंद्र पाटीलबुआ दांगट, मधुकर रामदास घुले आणि शेखर सहदेव मस्के.
महिला प्रतिनिधी : सुनीता संदीप धुमाळ आणि सुरेखा अनंता भाडळे.
इतर मागास प्रवर्ग : संजय अमृतराव सातव.
भटक्या-विमुक्त जाती प्रवर्ग : मल्हारी दत्तात्रय केसकर.
अनुसूचित जाती-जमाती प्रवर्ग : सत्यवान दगडू गायकवाड.
