भावानंतर मृत्यूशी झुंज देताना बहिणीचाही अंत; हजारे कुटूंबावर दु:खाचा डोंगर; उरुळीकांचन येथे अपघात तिसरा बळी…


उरुळी कांचन : दिवाळी सणादिवशी जेवणासाठी भावासह पार्सल आणण्यासाठी गेलेल्या भावंडांना कारने जोरदार धडक देऊन भावाचा मृत्यू झाल्यानंतर गेली पाच दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या बहिणीचाही खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे.

या अपघातात अत्यंत गरीब कुटूंबातील या दोघा भावंडांना अशा पध्दतीने दुर्दैवी अंत झाल्याने उरुळीकांचन परिसरात या घटनेने मोठी भावनिक किनार या कुटूंबियाबद्दल उमटली आहे.

दिवाळीसणा दिवशी (दि.८ ) रोजी भरधाव कारने नयन नितीन हजारे (वय १९,रा.तुपेवस्ती, उरुळी कांचन) व बहिण तन्वी नितीन हजारे(वय-१६, रा.तुपे वस्ती,उरुळीकांचन ) या दोघा भावंडांना जबर धडक देऊन कारचालक तुषार उर्फ अमर रोहिदास कुंजीर (वय २३,रा.वळती,ता.हवेली) याचा झाडावर आदळून अपघातात मृत्यू झाला होता.

या अपघातात तन्वी ही गंभीर जखमी होऊन तिची प्रकृती चिंताजनक बनली होती. तन्वीला अशा आवस्थेत पुण्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु घटनेच्या पाचव्या दिवशी तिचा मृत्यू झुंज देताना मृत्यू झाला आहे.

या अपघातात नितीन हजारे या कुटुंबातील दोन्ही निरागस बालके या दुर्दैवी अपघातात ठार झाल्याने या कुटुंबावर आभाळ कोसळे आहे. अत्यंत प्रतिकुल परिस्थिती या भावंडांनी परिस्थिती संघर्ष करुन आपले शिक्षण पदव्युत्तर आभासक्रमापर्यंत पूर्ण केले होते.

या भावंडांकडून हजारे कुटुंबायांना मोठ्या अपेक्षा असताना काळाने या भावंडांवर क्रुर झडप घातल्याने परिसरात या दुर्दैवी घटनेने मोठी शोककळा पसरली आहे. बुधवार दि.१२ सायंकाळी चार वाजता उरुळीकांचन स्मशानभूमीत या तन्वीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुर्दैवी प्रसंगात भावंडांना बळी गेल्याने नागरीक गहिवरले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!