ब्रेड भाजून खावा की न भाजता? कोणता आहे आरोग्यासाठी उत्तम? जाणून घ्या योग्य पद्धत…

पुणे : ब्रेड हा आपल्या दररोजच्या आहारातील एक महत्त्वाचा पदार्थ आहे. काही लोकांना साधा ब्रेड, तर काहींना भाजलेला ब्रेड आवडतो? प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धतींनी ब्रेडचे सेवन करतात.
पण कधी तुम्ही विचार केला आहे का, की आरोग्याच्या दृष्टीने कोणता पर्याय अधिक फायदेशीर आहे? टोस्ट केल्यामुळे ब्रेडच्या पोषक घटकांमध्ये काही बदल होतात का? आणि या बदलांचा वजनावर किंवा आरोग्यावर काय परिणाम होतो? जर तुमचं मन देखील या प्रश्नांनी गोंधळलं असेल, तर चला, जाणून घेऊया की टोस्ट केलेला ब्रेड आणि साधी ब्रेड यामधील फरक व तुमच्या आरोग्यसाठी काय चांगले असू शकते..
ब्रेड टोस्ट केल्यावर तिच्यातील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे ती हलकी आणि कुरकुरीत बनते. मात्र, याचा थेट परिणाम ब्रेडच्या कॅलोरी आणि पोषकतत्त्वांवर होत नाही, पण काही छोटे बदल नक्कीच होतात. चला जाणून घेऊया.
ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी होतो: साध्या ब्रेडच्या तुलनेत टोस्ट केलेल्या ब्रेडचा GI स्तर थोडा कमी असतो, म्हणजेच ती रक्तातील साखर हळूहळू वाढवते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हा पर्याय फायदे शीर ठरू शकतो.
काही प्रमाणात स्टार्चचे ब्रेकडाउन होते.
टोस्ट केल्याने ब्रेडमधील स्टार्च थोडासा बदलतो, ज्यामुळे ती पचायला सोपी होते.
कॅलोरीमध्ये मोठा फरक पडत नाही
काही लोकांना वाटते की ब्रेड टोस्ट केल्याने तिच्या कॅलोरी कमी होतात, पण तसे होत नाही. टोस्टिंगमुळे फक्त आर्द्रता कमी होते, कॅलोरी नाही.
दरम्यान, तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर साधी किंवा टोस्ट केलेली ब्रेड यापैकी कोणतीही विशेष प्रभावी ठरणार नाही, जोपर्यंत तुम्ही योग्य प्रकारची ब्रेड निवडत नाही. जर तुम्हाला लवकर भूक लागत असेल, तर ब्राउन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड थोडीशी टोस्ट करून खाणे चांगले ठरेल, कारण त्यामुळे पचनाची गती कमी होईल आणि पोट जास्त वेळ भरलेले राहील.
जर तुम्ही ब्लड शुगर नियंत्रित करू इच्छित असाल, तर टोस्ट केलेली ब्रेड चांगला पर्याय ठरू शकते, कारण तिचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.
जर तुम्ही ब्रेडवर भरपूर लोणी, जॅम किंवा बटर लावत असाल, तर साधी ब्रेड असो किंवा टोस्टेड, दोन्ही वजन वाढवू शकतात. त्यामुळे ब्रेडसोबत काय खाता याकडेही लक्ष द्या….