धक्कादायक! बलात्कार करुन पीडितेचा मृतदेह शेतात फेकला, मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला, थरकाप उडवणाऱ्या घटनेने सगळे हादरले..


नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन तिचा मृतदेह मोकळ्या शेतात फेकून देण्यात आला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. भटक्या कुत्र्यांनी या मृतदेहाच्या शरीराचे लचके तोडले, मृतदेहाचा काही भाग खाल्ला.

या घटनेमुळे देशात संताप व्यक्त केला जात आहे. मृतदेह सापडला त्यावेळी इतक्या खराब अवस्थेत होता की, त्यावरुन लिंगाची ओळखही पटवता येत नव्हती. या आरोपींनी सामूहिक बलात्कार करुन या मुलीची भोसकून हत्या केली. या प्रकरणात एकूण चार आरोपी असून तीन अल्पवयीन आरोपी आहेत.

पीडितेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडल्यानंतर ही घटना समोर आली. मृतदेहाचा काही भाग भटक्या कुत्र्यांनी खाल्लेला होता. एका हात मृतदेहापासून तुटून बाजूला पडलेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. पीडित मृत मुलगी आरोपींना ओळखत असल्याची माहिती आहे.

सर्वजण एकत्र टेम्पो मधून प्रवास करत असताना हा प्रकार घडला असे पोलिसांनी सांगितले. टेम्पोमध्येच ते एकत्र दारु प्याले. नंतर त्यांनी मुलीवर बलात्कार केला. तिची हत्या केली व मृतदेह फेकून दिला. नंतर कुशक रोडवर स्वरुपनगरमध्ये जयपाल राणा यांच्या शेतात मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला.

दरम्यान, शोध मोहिम राबवून पोलिसांनी संशयित टेम्पो ताब्यात घेतला. ड्रायव्हरची ओळख पटवून चौकशी केली. त्यातून गुन्ह्याचा तपास समोर आला. शिवम उर्फ सुदामा उर्फ चुचू याची ओळख पटवण्यात आली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!