धक्कादायक! विधिमंडळातील एंट्रीसाठीचे पास 5 ते 10 हजारांना विकले जातात ; आमदाराच्या दाव्याने खळबळ


पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट विधानसभा भवनात जोरदार राडा झाला. त्यावरून आज विधानपरिषदेत चर्चा होत असताना विधिमंडळात येण्यासाठी चक्क पाच ते दहा हजार रुपयांना पास विकले जात असल्याचा खळबळजनक आरोप आमदार शशिकांत शिंदे आणि आमदार अनिल परब यांनी केला आहे.

आमदार शशिकांत शिंदे यांनी सध्या विधानभवनात येण्यासाठी पासचा रेट 5 हजार रुपये ते 10 हजार रुपये सुरू आहे,असा धक्कादायक आरोप केला आहे.सभापतींनी निर्देश दिले होते गेटपास बंद करा मग तरीही पास कुणी सुरू केले ? सभापतींची भावना चांगली असेल मग गर्दी कशी आली? लोक येऊ द्या असं सांगणारा मंत्री कोण ? सभागृहाची पत राखली पाहिजे, कायदेमंडळात आमदार असुरक्षित आहेत. सर्व चर्चा दूर ठेऊन राज्यातील शिस्त,संयम कायदा सुव्यवस्था यावर चर्चा ठेवा असंही ते म्हणाले.

दरम्यान काल जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनात जोरदार राडा झाला. या राड्याचे आजच्या अधिवेशनात जोरदार पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले. विधानभवनात कोणालाही प्रवेश दिला जातो, गुंडांना घेऊन नेते येतात असा आरोप करत विरोधक आक्रमक झाले. यावेळी विधानभवनात प्रवेश पाससाठी किती पैसे घेतले जातात याबाबत मोठा खुलासा केला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!