सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील धक्कादायक प्रकार!! राईसमध्ये रबराचे तुकडे, विद्यापीठाकडून चौकशीचे आदेश…


पुणे : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या वसतीगृहात ढेकणं आढळून आली होती, त्याचबरोबर जेवणात आळ्या देखील आढळून आल्या होत्या. त्यानंतर आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फूड कॅन्टीनच्या जेवणात चक्क रबर दिसून आले आहे.

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरु आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फूड कोर्टमधील ‘Route 93’ या चायनीज गाळ्यामध्ये हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जेवणात रबर आढळल्याचा आरोप केला आहे.याबाबत फोटो सोशल मोडियावर व्हायरल झाले आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सायंकाळी जेवणाच्या वेळी फ्राईड राईस आणि नूडल्स मागवले होते. त्यावेळी फ्राईड राईस आणि नूडल्स खात असताना फ्राईड राईसमध्ये रबर आढळून आल्याचं समोर आलं आहे. विद्यापीठात जेवणाच्या बाबतीत वारंवार हलगर्जीपणा समोर आल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत.

यामुळे या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याच्या चर्चा होऊ लागल्या. विद्यापीठाकडून समिती स्थापन करत चौकशी करण्यात येणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील फूड कॅन्टीनच्या जेवणात चक्क रबर निघालं. पुणे विद्यापीठाच्या फूड कोर्टमधील Route 93 या चायनीज गाळ्यात हिंदी विभागाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जेवणात रबर आढळल्याचा आरोप केला आहे.

अशा प्रकारच्या तक्रारी सतत वाढत असल्याने याबाबत विद्यार्थी चिंतेत आहेत. विद्यार्थ्यांनी बुधवारी सायंकाळी जेवणाच्या वेळी फ्राईड राईस आणि नूडल्स मागवले असताना त्यात रबर निघालं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे याबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!