साताऱ्यात धक्कादायक प्रकार!! सातवीतील मुलगी गर्भवती, 25 वर्षीय चुलतभावाकडूनच….


सातारा : सातारा शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील उपनगरात राहणाऱ्या एका 25 वर्षीय तरुणाने सातवीत शिकणाऱ्या चुलत बहिणीवर वारंवार अत्याचार केला. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यातून बहीण गर्भवती राहिली. यामुळे प्रकरण उघडकीस आले.

याबाबत शहर पोलिसांनी भावाला अटक केली आहे. पोटात वेदना होऊ लागल्यानंतर पीडितेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी ती गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. ही मुलगी 13 वर्षांची आहे. काही महिन्यांपासून चुलत भाऊ तिच्यावर वारंवार  बलात्कार करीत होता.

याबाबत घरच्यांनी विचारपूस केल्यानंतर तिने चुलत भावाने अत्याचार केल्याचे सांगितले. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझा भाऊ आणि आई-वडिलांना मारेल अशी धमकी तो देत होता. त्यामुळे पीडितेने हा प्रकार कोणाला सांगितला नाही. मात्र नंतर खूप वेदना होत असल्याने ती घाबरली.

पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली. पीडिता केवळ तेरा वर्षांची आहे. तिला गर्भपाताची परवानगी द्यावी, अशी मागणी पोलिस व नातेवाईकांकडून न्यायालयाकडे करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेनंतर मोठी खळबळ उडाली असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. घटनेमुळे मुलीच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत सध्या तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!