बारामतीत धक्कादायक घटना! अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीने कोठडीतच घेतला गळफास


बारामती : बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात अटकेत असलेल्या रमेश गार्डी या आरोपीने पोलीस कोठडीतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रमेश गार्डी याच्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर गुन्हा दाखल होता. या प्रकरणी तपासादरम्यान वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्याला अटक केली होती. अटकेत असताना आज सकाळी सुमारे सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास त्याने कोठडीत गळफास घेत आत्महत्या केली.

पोलीस ठाण्यासारख्या सुरक्षित ठिकाणी, पोलिसांच्या देखरेखीखाली असताना आरोपीने आत्महत्या केल्याने सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सकाळी ही घटना उघडकीस येताच पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणात कर्तव्यावर असलेल्या पोलिसांकडून काही निष्काळजीपणा झाला का, याची चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!