MPSC चा मुद्दा तापला! संभाजी ब्रिगेडने थेट MPSC च्या सचिवांच्या तोंडाला काळ फासलं, राज्यात वातावरण तापले….


मुंबई : आज नवी मुंबईत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी MPSC चे सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या तोंडाला काळ फासलं. MPSC चे अध्यक्ष आणि सचिव महेंद्र हरपाळकर यांचा राजीनामा घ्यावा अशी एमपीएससीच्या परीक्षार्थींची मागणी आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून हा वाद पेटला आहे. महाराष्ट्रात सध्या MPSC च्या विद्यार्थ्यांचा प्रश्न गाजत आहे.

औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटल्यापासून एमपीएससी विद्यार्थ्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. पुणे, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे रस्त्यावर उतरुन MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. यामुळे सरकारपुढील अडचणी देखील वाढत आहेत. येणाऱ्या काळात याबाबत ठोस उपास करणे गरजेचे असणार आहे.

पेपर फुटीचं हे प्रकरण त्यांच्या कार्यकाळात घडलं आहे. पेपर फुटीमध्ये MPSC मध्ये काम करणाऱ्या लोकांचा सहभाग असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. अशा पद्धतीची लोकं MPSC वर नसवीत अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज एमपीएससी सचिवांच्या तोंडाला काळं फासून एकप्रकारे त्यांच्या अध्यक्षांना इशारा दिला आहे.

नवी मुंबईच्या कार्यालयात जाऊन संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हे काम केलं. या घटनेचे पडसाद उमटू शकतात. रोहित पवारही MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात सहभागी झाले होते. त्यांनी सुद्धा MPSC विद्यार्थ्यांचे प्रश्न लावून धरले आहेत. यामुळे याबाबत कडक कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान, MPSC अध्यक्षांचा राजीनामा घेण्याच्या मागणीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहमत नाहीय. “एमपीएससी आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊन फायदा नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. पेपरफुटीचे प्रकरण घडले त्यावेळी विद्यमान अध्यक्ष नव्हते. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेणं अतार्किक असल्याचे त्यांनी सांगितले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!