धक्कादायक! नवऱ्याचे मित्रासोबतच होते समलैंगिक संबंध, बायकोने चुकून नको त्या अवस्थेत बघितलं अन् सगळंच संपवलं….

एका विवाहितेने पतीच्या कृत्याला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना पंजाबमध्ये घडली आहे. महिलेच्या पतीचे त्याच्या एका मित्रासोबत समलैंगिक संबंध होते. ही घटना कोटकपुरा येथे घडली आहे. मोगा जिल्ह्यातील बाघापुराना येथील गज्जन वाला गावातील रहिवासी साधू सिंह यांनी याबाबत माहिती दिली.
त्यांची मुलगी रीना कौर हिचा विवाह कोटकपूरा येथील सोनू सिंह याच्याशी 9 वर्षांपूर्वी झाला होता. लग्नानंतर दोघांना एक मुलगा झाला. एके दिवशी दोघेही आपल्या मुलाला घेऊन एका धार्मिक स्थळी दर्शनासाठी गेले होते. तसेच त्यांच्याबर कोटकपूरा येथील अनमोल ऊर्फ जगविंदर सिंग नावाचा एक व्यक्ती गेला होता.
यानंतर एक दिवस दिवशी रीनाने तिच्या पतीला आणि अनमोलला घरात समलिंगी संबंध ठेवताना पकडले. यामुळे तिला धक्काच बसला. तिचा संतापाचा पारा वाढला. दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत होते. त्यावरून त्यांनी गदारोळ घातला.
नंतर सोनूने त्याची पत्नी रीना कौरची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण तिने या संबंधांना विरोध सुरूच ठेवला. तिच्या वहिनीनेही वहिनीला साथ देण्याऐवजी भावाला साथ दिली. नंतर पती आणि वहिनीने ऐकले नाही आणि तिच्यावर घर सोडण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. यामुळे वाद वाढत गेला.
यानंतर पतीच्या कृत्याला कंटाळून रीना कौर हिने घरातील खोलीत ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे एकच खळबळ उडाली. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला असून अनेकांची चौकशी केली जात आहे.
पोलिसांनी मृताच्या वडिलांच्या जबाबावरून महिलेचा पती सोनू सिंग, वहिनी आणि तरुण अनमोल उर्फ जगविंदर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा तपास करत आहेत. या घटनेने मात्र सगळे हादरले आहेत.