धक्कादायक! ताम्हिणी घाटात मित्राची भयानक हत्या,आरोपीकडून त्याचीच गाडी विकण्याचा सौदा, पण ‘स्मार्ट वॉच’ने डाव उलटवला


पुणे : माणगाव -पुणे मार्गावर ताम्हिणी घाटात 22 वर्षीय तरुण आदित्य याची त्याच्याच मित्रांनीच कोयत्याने सपासप वार करून हत्या केली असल्याची माहिती समोर आली होती.माणगाव पोलिसांनी अवघ्या 8 तासांत या हत्याकांडाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली आहे.हत्या केल्यानंतर आरोपी त्याची महागडी ‘इनोव्हा क्रिस्टा’ कार घेऊन पुण्यात आले होते. मात्र आदित्यच्या स्मार्ट वॉचने सगळा डाव उलगडला.

समोर आलेल्या माहितीनुसार, पैशाच्या वादातून आदित्यची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले. त्यानंतर एक व्यक्ती आदित्यचीचं कार घेऊन ती विकण्यासाठी ननावरे पुलाजवळ आली होती.पोलिसांनी तातडीने सापळा रचला आणि अनिकेत वाघमारे याच्याकडे कारच्या कागदपत्रांबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने अवघ्या काही तासांपूर्वी ताम्हिणी घाटात मित्राचा खून करून ही कार चोरल्याची कबुली दिली.

दरम्यान पोलिसांना ताम्हिणी घाटात सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटत नव्हती. मात्र, आदित्यच्या हातातील इलेक्ट्रॉनिक घड्याळाच्या तांत्रिक तपासणीमुळे माणगाव पोलिसांना मृताची ओळख पटवणे सोपे झाले. यामुळे गुन्हेगारांनी पुण्यात कार विकण्यापूर्वीच त्यांचे नाव पोलिसांच्या रेकॉर्डवर आले होते.

अखेर बाणेर पोलिसांनी अनिकेत वाघमारे आणि त्याचा साथीदार तुषार ऊर्फ सोन्या पाटोळे यांना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींना पुढील तपासासाठी माणगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!