दिल्लीतील स्फोटाचे धक्कादायक कनेक्शन उघड, थेट ‘या’ विद्यापीठाशी संबंध; खळबळजनक माहिती समोर, तब्बल ११ तास..

नवी दिल्ली : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर एकच खळबळ उडाली. काही तासातच स्पष्ट झाले की, हा स्फोट नसून घातपात आहे. या प्रकरणात काही डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली.

लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाबद्दल धक्कादायक खुलासे होत असून थेट पुलवामा कनेक्शन पुढे आले. तसेच i-20 मध्ये दहशतवादी उमर तोंडाला काळे मास्क लावून लावल्याचे स्पष्ट झाले. उमरच्या आईला पोलिसांनी अटक केली. उमरच्या भावाकडून तब्बल 18 मोबाईल फोन पोलिसांनी जप्त केली असून अधिकची चाैकशी केली जात आहे.

हेच नाही तर आता i-20 कारबद्दल अत्यंत खळबळ उडवणारी माहिती पुढे येत आहे. ही कार तब्बल ११ तास दिल्लीमध्ये फिरत होती. या कारच्या संदर्भातील अनेक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागली आहेत. या कारच्या हालचालींचा तपास करताना पोलिसांना अल फलाह विद्यापीठाच्या CCTV फुटेजमध्ये कार स्पष्ट दिसल्याचं आढळलं. काही तासांपर्यंत ही कार तिथेच उभी होती.

गाडी दहशतवादी उमर चालवत असल्याचं फुटेजमध्ये दिसत आहे, मात्र गाडीच्या मागील सीटवर कोण बसलं होतं, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत काही डॉक्टरांना अटक केली आहे. तपासात या स्फोटाचा थेट पुलवामा कनेक्शन असल्याचंही समोर येतंय. उमरच्या आईलाही पोलिसांनी अटक केली असून, त्याच्या भावाकडून तब्बल १८ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. यातील संभाषण आणि डेटा तपासला जात आहे.
तपासातून समोर आलं आहे की हा मोठा घातपात करण्याचा कट रचला गेला होता. मात्र स्फोट घाईघाईत झाल्यामुळे नुकसान अपेक्षेपेक्षा कमी झालं. स्फोटाच्या वेळी i-20 कार लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये उभी होती. फुटेजनुसार, ही कार पहाटे ३.१९ वाजता अल फलाह विद्यापीठाबाहेर दिसली आणि त्यानंतर सायंकाळी ६.४८ वाजेपर्यंत लाल किल्ल्याजवळ पार्किंगमध्ये होती. कार पार्किंगच्या बाहेर आली आणि काही मिनिटांतच स्फोट झाला.
या i-20 कारची सुरुवात दिल्लीतील मोहम्मद सलमान यांच्याकडून झाली होती. त्यांनी ही कार नदीम नावाच्या व्यक्तीला विकली. नंतर नदीमने ती रॉयल कार झोन या डिलरमार्फत पुढे विकली आणि अखेरीस ही कार उमर याने घेतल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे.
