धक्कादायक! एकनाथ शिंदे यांच्या शिलेदारासह १४ जणांवर गुन्हा दाखल; नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण?


पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते तथा माजी आमदार रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नीसह १४ जणांविरोधात पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खलील शेख यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून काही व्यक्तींवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी बाळा शेंडगे, रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी आणि इतरांसह एकूण १४ जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, प्रकल्पातील आर्थिक व्यवहार, थकीत बिले आणि वाढता कर्जाचा बोजा यामुळे खलील शेख मानसिक तणावाखाली होते. आत्महत्येपूर्वी त्यांनी संबंधितांना कायदेशीर नोटीस पाठवण्याची तयारी केल्याचाही दावा त्यांच्या मुलाने केला आहे.

या प्रकरणात बाळा शेंडगे यांची मुख्य भूमिका असल्याचा आरोप करत, प्रकल्पातील साहित्यही बाहेर काढू दिले नसल्याचा दावा शेख यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. दरम्यान, तपासासाठी पोलिसांनी खलील शेख यांचा मोबाईल जप्त केला असून त्यातील माहितीची पडताळणी सुरू आहे.

दुसरीकडे, रवींद्र धंगेकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. “आम्ही २०२५ मध्येच या प्रकल्पातून बाहेर पडलो होतो. खलील शेख यांना ७० ते ८० लाख रुपये दिले होते. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून या प्रकरणाशी आमचा कोणताही संबंध नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रकरणाचा अधिक तपास पुणे पोलीस करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!