कोरेगावच्या तरुणांचे धक्कादायक कृत्य! थायलंडमध्ये रशियन महिलेवर बलात्कार, तरुणीच्या शरीराचे लचके तोडले अन्….

सातारा : साताऱ्यातील दोन जणांनी संपूर्ण देशाची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य केले आहे. या दोघांनी थायलंडमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरले आहे.
थायलंड येथील सुरत थानी प्रांतातील कोह पांगण जिल्ह्यातल्या बाण ताई उपजिल्हा गाव क्रमांक सहा येथील रीन बीचवर या दोघांनी जर्मन महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
तिथे दोघांनी जर्मन महिलेवर सामूहिक बलात्कार केला आहे. या घटनेमध्ये या जर्मन महिलेच्या शरीराचे लचके देखील या दोघांनी तोडले. त्यामुळे पिडीत महिलेने नजीकच्या कोहपांगण पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली.
मिळालेल्या माहिती नुसार, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दोघेजण थायलंडमध्ये कोहोप्रांगण जिल्ह्यातील बाणताई येथील रीन बीचवर फिरायला गेले. दरम्यान. पोलिसांनी सीसीटीव्ही आणि काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या माहितीनुसार दोघांना अटक केली. या २४ वर्षीय महिलेला असे हे वेदना दिल्याने पोलिसांनी दोघांना अटक केली असून याची माहिती भारत सरकारला दिली आहे.