नवी मुंबईत अपघाताचा थरार ; क्रेटाने धडक दिल्याने कार 25 फूट कोसळली अन तरुणाचा जागीच…..


मुंबई : नवी मुंबईतील पुलावर क्रेटाने धडक दिल्याने स्विफ्ट कारचा भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही धडक इतकी जोरात होती की,पुलाचे रेलिंग तोडून थेट कार नदीत कोसळली. या घटनेत चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मृत व्यक्तीला उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे नेण्यात आले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईच्या सायन पनवेल महामार्ग खारघर खाडी पुलावरुन एका कारचा भीषण अपघात झाला आणि ती थेट नदीत कोसळली. क्रेटा कारणे मागून धडक देऊन नियंत्रण सुटल्याने गाडी पुलाचं रेलिंग तोडून थेट 25 फूट खाली कोसळली आणि नदीच्या पाण्यात पडली.शुक्रवार रात्री दहा वाजेच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.या घटनेत कार चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकाने धाव घेत अग्निशामक दलाच्या मदतीने गाडीला पाण्यातून बाहेर काढले .

या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे, पोलिसांनी मृत व्यक्तीला जवळच्या पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र रोड पुलावरील या भीषण अपघातामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.

       

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!