धक्कादायक! पुण्यात आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली भलतच कांड, पोलिसांनी गिऱ्हाईक पाठवलं अन्….

पुणे : आयुर्वेदिक उपचार केंद्राच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश करीत गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने तिघांवर कारवाई केली आहे. याप्रकरणी एका विधिसंघर्षित मुलासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईत पोलिसांनी एका पीडित महिलेची सुटका केली असून, तिला पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात ढकलण्यात आले होते. या प्रकरणी स्पा चालक विद्या मदन मंडले आणि प्रमोद बबन खाटपे यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरून २३ हजार २०० रुपयांची रोकड आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक आशालता खापरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी सायंकाळी ४ वाजून ४५ मिनिटांनी ही धडक कारवाई करण्यात आली.

तपास करताना असं समोर आले की, आरोपी पीडित महिलेकडून वेश्याव्यवसाय करून घेत होते आणि त्यातून ती मिळणाऱ्या पैशांवर स्वतःची उपजीविका भागवत होते. मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या एका मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. सिंहगड रोड सारख्या मुख्य परिसरात अशा प्रकारे अवैध धंदे सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
