अजित पवार गटाला धक्का! तरुण पदाधिकाऱ्याने केली आत्महत्या, धक्कादायक माहिती आली समोर..


सोलापूर : राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाच्या तरुण पदाधिकाऱ्याने जीवन संपवल्याने सोलापुरात मोठी खळबळ उडाली आहे. ओंकार हजारे असं त्यांचे नाव आहे. याबाबत पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओंकार कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडले. संध्याकाळपर्यंत न परतल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरू केली.

एका सुपरमार्केटजवळ असलेल्या गाडीत ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यांना शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय का घेतला याबाबत तपास सुरु आहे.

ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस होते. ‘अण्णा’ या टोपणनावाने परिचित असलेल्या ओंकार हजारे यांचं अकाली निधन झाल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपासून ते मानसिक तणावात असल्याचं सांगितलं जात आहे. रविवारी त्यांच्या मेव्हण्याचं लग्न होतं, मात्र त्या लग्नाचं निमंत्रण ओंकार यांना दिले नव्हते.

यामुळे घरगुती वाद असल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून ओंकार हजारे यांनी सोलापुरात संघटनात्मक पातळीवर चांगलं काम केलं होतं. युवकांमध्ये त्यांना ‘अण्णा’ या नावाने सगळे हाक मारत होते. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण पक्षात दुःखाचं वातावरण पसरलं आहे.

या घटनेने केवळ पक्षच नव्हे, तर सोलापूर जिल्ह्यातील युवकांमध्ये शोककळा पसरली आहे. अनेकांनी त्यांच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. याबाबत सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सुरू आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अजून समोर आले नाही.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!