शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या कारचा अपघात ; कारने दुचाकीस्वार आणि नागरिकांना चिरडलं, गुन्हा दाखल होणार?


पुणे : महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अंबरनाथ नगरपरिषदेत किरण चौबे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना अंबरनाथमध्ये किरण चौबे यांच्या कारचा भीषण अपघात झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.बुवापाडा परिसरात संघटनेच्या सभेसाठी जात असताना कारचा अपघात झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, किरण चौबे यांचा ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे याला अचानक हार्टअटॅक आला. त्यामुळे त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं अशी माहिती चौबे यांच्या नातेवाईकांनी दिली. अपघातात ड्रायव्हर लक्ष्मण शिंदे, अंबरनाथ महानगरपालिकेचे दोन कर्मचारी आणि एका पादचारी नागरिकाचा मृत्यू झाला. किरण चौबे यांना सुद्धा या अपघातात मार लागला आहे. त्यांना तातडीने कल्याणच्या फोर्टिस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.किरण चौबे यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान या अपघात प्रकरणात अंबरनाथ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुलावर वाहतूक कोंडी झाल्यानंतर पोलिसांनी किरण चौबे यांची अपघातग्रस्त कार पोलीस स्थानकात हलवली. काल सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान अंबरनाथ पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलावर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किरण चौबे यांच्या कारने बाईक स्वार व काही पादचारी नागरिकांना चिरडलं. या प्रकरणी पोलिसांनी रात्रभर अनेक जणांचे जबाब नोंदवले. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!